खुशखबर !!!

Foto

आज रात्री मान्सूनचा प्रवास औरंगाबादेतून...!


दक्षिण -पश्चिम मान्सून आज औरंगाबाद जिल्ह्यात दस्तक देणार आहे. दोन दिवसांपूर्वी केरळ- कोकणात दस्तक मान्सूनचे आगमन झाले होते. आज रात्री उशिरा मान्सून चे वारे औरंगाबाद जिल्ह्यातून वाहणार असल्याची माहिती आयएमडीचे शास्त्रज्ञ राजेश कुमार यांनी दिली. 
मान्सून आता मराठवाड्यात दाखल होत असून मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच मराठवाड्याच्या बहुतांश भागात मान्सूनचे आगमन होणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगडचा काही भाग, पश्चिम बंगालचा आणि झारखंडमधील बहुतांश भागात मान्सून दाखल होणार आहे. केरळ पासून सुरू झालेला मान्सूनचा प्रवास आता दिल्लीच्या दिशेने सुरू आहे. उत्तर भागातून प्रवेश केलेला मान्सून आज रात्री हरनाई, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया, चंपा, रांची तसेच भागल्पुर या शहरांतून मार्गस्थ होईल. दक्षिणी पश्चिम मान्सून साठी अरबी समुद्रात अनुकूल परिस्थिती असून उत्तर अरबी महासागरातही मान्सूनचा वेग चांगला आहे. त्यामुळे मुंबई, छत्तीसगड आणि झारखंड तसेच बिहार पर्यंत येत्या दोन दिवसात मान्सूनचा प्रवास सुरळीत होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जिल्ह्यात आज मान्सून होणार दाखल ! 

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात आज रात्री मान्सून दस्तक देणार आहे. गेल्या एक जून पासून जिल्ह्यात पाऊस कोसळतो आहे. मात्र हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे आयएमडीचे शास्त्रज्ञ राजेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker